खडकाळ जमिनीत बहरले तैवानमधील कलिंगड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकाळ जमिनीत बहरले तैवानमधील कलिंगड
खडकाळ जमिनीत बहरले तैवानमधील कलिंगड

खडकाळ जमिनीत बहरले तैवानमधील कलिंगड

sakal_logo
By

मंचर, ता. ३१ : खडकाळ तसेच मुरमाड जमीन विकसित करून पेठ (ता.आंबेगाव) येथील प्रगतशील शेतकरी राहुल सुदाम सणस यांनी आरोग्यवर्धक, व्याधीशामक
कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेण्यात यश मिळविले. सेंद्रिय खतांचा जोरावर तैवान देशातील पिवळ्या व लाल रंगाचा गर असलेल्या कलिंगडाचा पहिला तोडा तब्बल दहा टनाचा झाला आहे. त्यास प्रती किलोला १९ रुपये बाजारभाव मिळाल्याने ते मालामाल झाले आहेत.

कृषी पदवीधर असलेले सणस यांना एकरी खर्च वजा जाता दोन महिन्यात तीन लाख रुपये निव्वळ उत्पन्न शिल्लक राहील, असा आत्मविश्‍वास आहे. तसेच अजून १५ टन उत्पादन अपेक्षित आहे. त्यांची पाच एकर जमीन आहे. अर्धा एकर जमिनीत शेततळे व उर्वरित साडेचार एकर क्षेत्रात सतत नवीन शेतीचे प्रयोग ते राबवतात. दरम्यान, अनेक मॉल चालक व व्यापाऱ्यांनी शेतावर येऊन तसेच काहींनी ऑनलाइन बुकिंग खरेदीसाठी केले आहे. शुक्रवारपर्यंत (ता.१० फेब्रुवारी) उत्पादन सुरु राहील.


मधमाश्यांचा फळधारणेसाठी उपयोग
शेतकरी राहुल सणस यांनी २५ सप्टेंबर २०२२ रोजी रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर पाऊन फूट ठेवले. तसेच कलिंगडासह २०० खरबूज रोपांची लागवड केली. परागीभवनासाठी २०० झेंडू रोपे लावली. दररोज आठ दिवस रोपांना पाण्याचा चूळ दिला. त्यांनतर ठिबक सिंचनाद्वारे वाढीसाठी विद्राव्य खते दोन दिवसांच्या अंतराने सोडली. तीस दिवसानंतर पिकाच्या फूल धारणेच्यावेळी परागीभवनासाठी मधमाश्या तेथे गोळा झाल्या. त्याचा फायदा फळ धारणेसाठी झाला. दरम्यान, ५५ दिवसानंतर फळांची पूर्ण वाढ झाली.

असे घेतले उत्पादन
१. जमिनीची उभी आडवी नांगरट
२. शेणखत टाकून आठ फूट अंतरावर बेड बनविले
३. ठिबक सिंचनाची जोडणी करून मल्चिंग पेपर अंथरले
४. सिंचनाद्वारेविद्राव्य खते दोन दिवसांच्या अंतराने सोडली
५. फळवाढीसाठी दहा दिवंसाच्या अंतराने जीवामृतचा वापर

७०००....कलिंगडाच्या रोपाची लागवड
एक लाख ४५ हजार...लागवडीसाठी खर्च
चार किलो...... वजनाचे फळ


जानेवारीपर्यंतचे बाजारभाव
२०१९....१८ रुपये
२०२०....१२ रुपये
२०२१....११ रुपये
२०२२.... १४ रुपये
२०२३ ....१९ रुपये


बाहेरून पिवळा आतून लाल, बाहेरून हिरवा आतून पिवळा, बाहेरून काळा आतून लाल,बाहेरून गडद हिरवा व आतून फिक्कट पिवळ्या रंगाचा गर निघतो. या कलिंगडांना लहान मुले, युवक-युवतींकडून मोठ्या प्रमाणात पसंती आहे. मुंबई, पुणे व मॉलमधून बिकिंगद्वारे मागणी वाढली आहे.
- राहुल सणस, प्रगतशील शेतकरी

07390, 07392

..........................
298425455