कृतियुक्त शिक्षणाला वाव द्या : पुजारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृतियुक्त शिक्षणाला वाव द्या : पुजारी
कृतियुक्त शिक्षणाला वाव द्या : पुजारी

कृतियुक्त शिक्षणाला वाव द्या : पुजारी

sakal_logo
By

मंचर, ता. ३१ : विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल, जिज्ञासावृत्ती विकसित केल्यास विज्ञान विषय अधिक सोपा होवू शकतो. शालेय वयातच विज्ञानाची आवड जोपासल्यास वैज्ञानिक संकल्पना सहज सोप्या पद्धतीने समजू शकतात. त्यामुळे कृतियुक्त शिक्षणाला वाव दिला पाहिजे.” असे प्रतिपादन विज्ञान प्रसारक प्राध्यापिका प्रज्ञा पुजारी यांनी केले.
‘सकाळ’ माध्यम समूहाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) या उपक्रमातंर्गत विज्ञानातील गमती जमती या कार्यशाळेत पुजारी बोलत होत्या. यावेळी खडकी पिंपळगाव येथील लक्ष्मीबाई बाबूराव काळभैरवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वळसे पाटील, प्रकाश चव्हाण, ज्योत्स्ना खेडकर, कैलास पोखरकर, प्रकाश घावरे, मोमीन मुनीर अब्दुल, अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालय प्राचार्य डी.डी. जाधव, जगदीश गुरव, सुजाता घोलप, शोभा पिंगळे, मनिषा गायकवाड उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील लक्ष्मीबाई बांगर काळभैरवनाथ माध्यमिक विद्यालय पिंपळगाव खडकी व रयत शिक्षण संस्थेचे भैरवनाथ विद्यालय, अवसरी खुर्द येथे ही कार्यशाळा झाली.

हवेचा दाब, ध्वनीतरंग, लोहचुंबकीय बल, स्ट्रॉच्या माध्यमातून तयार होणारे बासरीचे सूर, तसेच ध्वनीतरंगाच्या माध्यमातून निर्माण होणारे आवाज, विद्युत प्रवाह, बल, दाब, विद्युत ऊर्जा व त्याचे प्रकार आदी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून निर्माण करता येणारे प्रयोग यावेळी पुजारी यांनी प्रात्यक्षिकासह सादर केले. सकाळ एनआयईचे सहव्यवस्थापक विशाल सराफ यांनी व्यवस्था पहिली.

07404