Sat, March 25, 2023

शेवाळवाडी परिसरातून
वीज वाहिन्यांची चोरी
शेवाळवाडी परिसरातून वीज वाहिन्यांची चोरी
Published on : 7 February 2023, 10:51 am
मंचर, ता. ७ : शेवाळवाडी-मंचर (ता. आंबेगाव) येथील महावितरण कार्यालयाच्या आवारातील मोकळ्या जागेतून २८ हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियम वीज वाहिन्यांचे सात बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत मंचर पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत महावितरण कंपनीचे सहायक अभियंता संपत प्रल्हादराव उवेकर (रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.