घोड नदीच्या पात्रात पाणी सोडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घोड नदीच्या पात्रात पाणी सोडा
घोड नदीच्या पात्रात पाणी सोडा

घोड नदीच्या पात्रात पाणी सोडा

sakal_logo
By

मंचर,ता.१ : “आंबेगाव तालुक्यात घोडनदीतील पाणी आटत चालले आहे. हजारो एकर क्षेत्रात गुरांसाठी हिरवा चारा व अन्य पिके आहेत.पाण्याअभावी पिकांना धोका निर्माण होऊ नये म्हणून हुतात्मा बाबू गेनू जलाशयातून (डिंभे धरण) घोड नदीच्या पात्रात पाणी सोडावे,” अशी मागणी पिंपळगाव-खडकी (ता.आंबेगाव) ग्रामस्थांनी निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता डी एस कोकणे यांना भेटून केली. यावेळी त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
आंबेगाव तालुक्यात घोड नदीवर १४ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. पिंपळगाव येथे बंधाऱ्यांचे ढापे काढून टाकले आहेत. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी नदीपात्रातून पुढे गेले आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये नदीपात्रातील पाणी कमी झाल्यामुळे उभ्या पिकांचे पुढे काय होणार? या चिंतेत शेतकरी आहेत.
पाणी सोडण्याबाबत ग्रामस्थांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्या नेतृत्वाखाली कोकणे यांची भेट घेतली. कोकणे म्हणाले “डिंभे धरणातून दोन दिवसात पाणी घोड नदीच्या पत्रात सोडले जाईल. पिंपळगाव-खडकी येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा जुना असून सुरु असलेली पाण्याची गळती थांबविण्यासाठी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम जून महिन्याच्या सुरुवातीला केले जाईल.”
निवेदन देताना पाटबंधारे खात्याचे दीपक आढारी, दादाभाऊ पोखरकर, कैलास पोखरकर, बाळासाहेब पोखरकर, अनिल पोखरकर, अशोक बांगर, शरद कामठे, नानाभाऊ पोखरकर, दीपक पोखरकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.