Sun, April 2, 2023

दफनभूमीसाठी लिंगायत समाजाला जागा देण्याची भाजपची मागणी
दफनभूमीसाठी लिंगायत समाजाला जागा देण्याची भाजपची मागणी
Published on : 1 March 2023, 1:20 am
मंचर, ता.१ : मंचर नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात लिंगायत समाजाला दफनभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून द्यावी. सध्या असलेल्या दफन भूमी स्वच्छ ठेवावी. दफन भूमीला संरक्षक भिंत व प्रवेशद्वार बांधकाम करावे,अशी मागणी लिंगायत समाज व भाजप महिला मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता.१) करण्यात आली.
मागण्यांचे निवेदन मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांना देण्यात आले. “लिंगायत समाज स्मशानभूमीची प्रलंबित समस्या सोडवल्या जातील. असे जाधव यांनी सांगितले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या मंचर शहराध्यक्ष जागृती महाजन, संघटन सरचिटणीस छाया थोरात ,पूजा हुले, सुचिता महाजन, शैला महाजन, वंदना हापसे, मंजू महाजन उपस्थित होते.