मंचर येथे मंगळवारी मोफत नेत्र तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथे मंगळवारी
मोफत नेत्र तपासणी
मंचर येथे मंगळवारी मोफत नेत्र तपासणी

मंचर येथे मंगळवारी मोफत नेत्र तपासणी

sakal_logo
By

मंचर, ता. २४ : राष्ट्रसंत आचार्य १००८ परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या ३१व्या स्मृतीप्रित्यर्थ व दानशूर (स्व.) रिखबलाल भंडारी यांच्या स्मरणार्थ मंचर (ता. आंबेगाव) येथे चौंडेश्वरी माता मंदिराशेजारी जैन स्थानकात मंगळवारी (ता. २८) सकाळी दहा ते दुपारी तीन यावेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती शिबिराचे आयोजक मंचर जैन संघाच्या वतीने वतीने देण्यात आली. डॉ. मनोहर डोळे मेडिकलचे नारायणगाव व मोहन ठूसे नेत्र रुग्णालय यांच्यावतीने शिबिराचे आयोजन केले आहे. संगणकाद्वारे नेत्र तपासणी करून जवळच्या नंबरचे चष्मे मोफत देण्यात येतील. शिबिरात स्पेशल लेन्स टाकून बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोतीबिंदूचे निदान झाल्यास शस्त्रक्रियेसाठी त्याच दिवशी नारायणगाव येथे नेण्यात येईल. त्यांना जेवण, निवास, प्रवास, काळा चष्मा व औषधे आधी सुविधा विनामूल्य दिल्या जातील.