‘पवार बाबा की जय’ देवांश, आजीचा व्हिडिओ व्हायरल

‘पवार बाबा की जय’ देवांश, आजीचा व्हिडिओ व्हायरल

पवार बाबा की जय
चिमुकल्याच्या उद्‍गारांनी शरद पवार भारावले
मंचर, ता. ८ : “पवार बाबा की जय” असे चिमुकल्याच्या गोड आवाजातील उद्‍गार व्हिडिओ कॉलवर ऐकू येताच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्मितहास्य केले, तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही उत्स्फूर्त दाद दिली.
निघोटवाडी-मंचर (ता. आंबेगाव) येथील सुरेश निघोट डॉ. कोल्हे यांचे सोशल मीडिया प्रमुख आहेत. त्यांची आई ताराबाई यांना शरद पवार यांच्याशी संवाद साधायचा होता. त्यांची इच्छा पूर्ण झाली. सुरेश निघोट यांनी शनिवारी दुपारी डॉ. कोल्हे यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधला तेव्हा ते नाशिक परिसरात पवार यांच्याबरोबर असल्याचे कळले. त्यावेळी निघोट यांनी, ‘माझ्या आईला पवार साहेबांबरोबर बोलायचे आहे,‘ अशी कल्पना त्यांना दिली. त्यावर थोड्या वेळाने कॉल करतो, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. मग दोन मिनिटांतच व्हिडिओ कॉल आला. तेव्हा ६५ वर्षीय ताराबाई भारावून गेल्या. त्या हात उंचावून म्हणाल्या “हॅलो पवार साहेब नमस्कार.‘‘ त्यावर पवार म्हणाले, “नमस्कार काय म्हणतो आंबेगाव तालुका...” ताराबाई म्हणाल्या, “आम्ही आहोत तुमच्या बरोबर आहे. घाबरू नका.” पवार म्हणाले, “कायम, आजच नाही अनेक वर्ष...” ताराबाई म्हणाल्या, “हो कायमच” पवार म्हणाले, “सगळ व्यवस्थित आहे. काळजी करू नका.‘‘ ताराबाई म्हणाल्या, ‘‘आमचा पाठिंबा पवार साहेबांनाच’’
आजीचा हा संवाद ऐकून तीन वर्षांचा चिमुकला देवांश यालाही राहवले नाही. मग तो म्हणाला “पवार बाबा की जय!” त्याची ही प्रतिक्रिया ऐकून शरद पवार भारावून गेले. एक मिनिट ११ सेकंदाचा हा व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com