चिकन-अंड्याचे बाजारभाव घसरले

चिकन-अंड्याचे बाजारभाव घसरले

मंचर, ता. ११ : आषाढ महिना सोमवारी (ता. १७) संपणार आहे. स्थानिक पोल्ट्रीमधून कोंबड्यांची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रथमच चिकन व अंड्याचे बाजारभाव कमी झाले आहेत. गेल्या आठवड्यात प्रती किलो चिकनचा बाजारभाव २०० रुपये व ८४ रुपये डझन अंड्याचा बाजारभाव होता. सध्या १८० रुपये प्रती किलो चिकन व ७२ रुपये डझन अंड्याचे बाजारभाव आहेत. त्यामुळे खवय्यांना दिलासा मिळाला आहे. मटणाचे बाजारभाव स्थिर आहेत.

आंबेगाव तालुक्यात ३०० हून अधिक मटण, चिकन व अंडी विक्रीची लहान मोठी दुकाने आहेत. दररोज दोन टन चिकन व दीड टनापेक्षा अधिक मटणाची विक्री होते. रविवारीयापेक्षा अधिक विक्री होते. आखाडाचे थोडेच दिवस शिल्लक असल्यामुळे अनेक ठिकाणी जंगी आखाड पार्ट्या सुरू आहेत. मंचर, अवसरी खुर्द, गावडेवाडी, एकलहरे, लांडेवाडी, अवसरी फाटा, पिंपळगाव येथे मंगळवारी (ता. ११) सकाळपासूनच चिकन, मटण व अंडी खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ वाढली होती. काही कुटुंबामध्ये आषाढ महिन्यात भावकीला व मित्र परिवाराला सामूहिकरीत्या मटण किंवा चिकनचे जेवण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सध्या जेवणावळी सुरु आहेत.
-------------------

आंबेगाव तालुक्यात बॉयलरच्या जवळपास ५०० पोल्ट्री फार्म आहेत. सध्या जवळपास ४०० पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्या आहेत. श्रावण महिन्यात कोंबड्यांची मागणी घटणार असून, बाजारभावात घसरण होईल. त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांनी कोंबड्या विक्री करण्यावर भर दिला आहे. मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे चिकनचे दर कमी झाले आहेत.
- इसाक शेख, चिकन विक्रेते, एकलहरे-कळंब (ता. आंबेगाव)
........................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com