टोमॅटोमुळे वायाळ पतीपत्नी मालामाल

टोमॅटोमुळे वायाळ पतीपत्नी मालामाल

मंचर, ता. ३० : अवसरी खुर्द-वायाळमळा (ता.आंबेगाव) येथील राजेंद्र किसन वायाळ व पत्नी कल्पना या शेतकरी दांपत्याने बारा गुंठे क्षेत्रात टोमॅटो पीक घेतले आहे. त्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या नारायणगाव येथील बाजारात प्रती कॅरेटला शनिवारी (ता.२९) दोन हजार ३५० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला आहे. यामुळे वायाळ कुटुंब मालामाल झाले आहे.

वायाळ यांनी टोमॅटो रोपांची ता.१५ मे रोजी दीड हजार लागवड केली होती. मशागत, बागेची बांधणी, खते, औषधे, मजुरी असा एकूण आत्तापर्यंत तीस हजार रुपये खर्च झाला आहे. गुरुवारी (ता.२०) पहिला तोडा झाला होता. त्यावेळी दोन कॅरेट टोमॅटो उत्पादन निघाले. त्यास प्रती कॅरेट एक हजार ५०० रुपये बाजारभाव मिळाला. दिवसाआड तोडा सुरू आहे. शनिवारी चौथा तोडा झाला, १३ कॅरेट उत्पादन निघाले. एका कॅरेटमध्ये २० किलो टोमॅटो असतात. प्रती किलोला ११७ रुपये ५० पैसे बाजारभाव मिळाला.

मंचर- पारगावतर्फे अवसरी बुद्रुक (ता.आंबेगाव) रस्त्यालगतच असलेल्या टोमॅटो बागेला परिसरातील शेतकरी दररोज भेट देतात. दररोज सकाळी प्रज्ञा विक्रम काळे, तनया रवींद्र वायाळ, महेश राजेंद्र वायाळ ही त्यांची मुलेही आईवडिलांना कामात हातभार लावतात.


एका महिना टोमॅटो उत्पादन सुरू राहील. एकूण २५० कॅरेटपर्यंत उत्पादन जाईल. टोमॅटोचे बाजारभाव टिकून राहिल्यास आर्थिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत मिळेल.असा अंदाज आहे.
- राजेंद्र वायाळ, टोमॅटो उत्पादक

चोरट्यांची पिकावर वक्रदृष्टी
आंबेगाव तालुक्यात अवसरी खुर्द, आदर्शगाव गावडेवाडी, पिंपळगाव, चांडोली खुर्द, लांडेवाडी, वाढत्या किमतीमुळे चोरट्यांनी थेट शेतातील टोमॅटो पळविण्याचा धडाका लावला आहे. कधी नव्हे ते पिकातून कमाई करण्याची संधी आली असताना चोरट्यांची वक्रदृष्टी टोमॅटो पिकावर पडली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दिवसा व रात्री शेताची राखणदारी करावी लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com