अपघात टाळण्यासाठी आयुष घोलपने तयार केला ‘सेंसर गॉगल’

अपघात टाळण्यासाठी आयुष घोलपने तयार केला ‘सेंसर गॉगल’

Published on

मंचर, ता. ३ : चालकाला डुलकी लागून भीषण अपघात झाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी शेतकरी कुटुंबातील आयुष घोलप या इयत्ता आठवीतील विद्यार्थ्याने तयार केलेला ‘सेंसर गॉगल’ वरदान ठरणार आहे.
या गॉगलमध्ये डोळे झाकताच बझर वाजतो, त्यामुळे चालक सतर्क होऊन वाहनावर पूर्ववत नियंत्रण मिळवतो, यामुळे होणारा अपघात टळतो. नवी दिल्ली येथे बुधवारी (ता.१) आयुषने केलेले सादरीकरण पाहून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी भारावून गेले. त्यांनी आयुषच्या पाठीवर थाप टाकून कौतुक केले. तसेच पेटंटसाठी सर्वतोपरी मदत करण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
आयुष न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल अवसरी खुर्द येथे शिकत आहे. शाळेच्या संस्थापक स्वाती मुळे यांनी नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय पुणे -नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे समन्वयक अभियंता दिलीप मेदगे यांच्याशी चर्चा केली. दिल्लीत बुधवारी गडकरी यांच्या निवासस्थानी आयुषने तयार केलेल्या सेंसर गॉगलचे प्रात्यक्षिक सादर केले. प्रकल्प समजून घेत काही सूचना केल्या. हा गॉगल कमी दरामध्ये चालकासाठी उपलब्ध करण्यासाठी मदत व मार्गदर्शन केले. लहान वयात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गडकरी यांनी आयुषचे कौतुक केले. त्याला भेट वस्तू देऊन प्रोत्साहित केले. यावेळी अभियंता मेदगे, स्वाती मुळे, वडील अमोल घोलप व शिक्षक उपस्थित होते.

गॉगलमध्ये सेन्सर, बटण, बजर, बॅटरी, चार्जर आदी साहित्य वापरले आहे. त्यासाठी २५० रुपये खर्च आला आहे. भविष्यात या गॉगलवर तज्ज्ञांच्या माध्यमातून अभ्यास करून गॉगल विकसित केला जाईल. आयुषकडे अजूनही विविध प्रयोगाबाबत विविध कल्पना आहेत. त्याच्या कल्पनांना चालना मिळण्यासाठी, सायन्समध्ये करिअर करण्यासाठी शासन स्तरावर व इतर ठिकाणी प्रयत्न करणार आहे.
- स्वाती मुळे, संस्थापक न्यू ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल अवसरी खुर्द

माझे वडील अमोल घोलप यांचा एक वर्षापूर्वी अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले होते. तसेच समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताचे दृष्य पाहून मला कल्पना सुचली. चालकाला डुलकी लागल्यास त्याला अलर्ट कसे करता येईल, याचा मी विचार करत होतो. याबाबत मुख्याध्यापक सचिन बोरकर, शिक्षिका जिनी मोल यांच्या बरोबर चर्चा केली. सेन्सर गॉगल तयार केला. तसेच डोळे झाकल्यानंतर बजर वाजला. त्यानंतर विज्ञान प्रयोग शाळेत प्रात्यक्षिक सादर केले.
-आयुष घोलप, विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.