शिवाजीराव आढळराव पाटील

शिवाजीराव आढळराव पाटील

गेल्या पंधरा दिवसापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली. चाकणच्या सभेत धो धो पाऊस असताना राष्ट्रीय नेते व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सुनील तटकरे, आमदार दिलीप मोहिते यांच्यासह सर्व नेत्यांनी पावसात भिजून लोकांना मार्गदर्शन केले. पावसाची तमा न बाळगता अजितदादांचे विचार ऐकण्यासाठी जनसमुदाय थांबून राहिला. वरूणराजाचा शुभसंदेश मिळाला आहे. मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मी अडीच लाख मताधिक्याने विजयी होईल. समोरच्या उमेदवाराकडे गेल्या पाच वर्षात सांगण्याजोगे काहीच नव्हते. फक्त माझ्यावर वैयक्तिक स्वरूपाची अत्यंत हीन पातळीची टीका केली, हे मतदारांना अजिबात आवडले नाही. प्रत्येक गावात संपर्क असल्याने मागच्या सारखी चूक आम्ही करणार नाही, असे ग्रामस्थ आवर्जून सांगत होते. वातावरण अनुकूल आहे. माझे संपूर्ण कुटुंब प्रचारात सहभागी झाले होते. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके, महेश लांडगे, चेतन तुपे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुती पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले. त्यामुळे मी संसदेत जाणारच.
- शिवाजीराव आढळराव पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com