पेठ येथील प्रिया पिंगळेची सहाय्यक आरेखकपदाला गवसणी

पेठ येथील प्रिया पिंगळेची सहाय्यक आरेखकपदाला गवसणी

मंचर, ता. ११: पेठ (ता. आंबेगाव) येथील गरीब शेतकरी कुटुंबातील प्रिया उदय पिंगळे या तरुणीची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात सहाय्यक आरेखकपदी निवड झाली आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रिया यांचे पेठ येथील पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक व श्री वाकेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीपर्यंत शिक्षण घेतले. आई, वडील, तीन बहिणी व एक भाऊ असा परिवार आहे. घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. जिरायती शेतीच्या अल्पशा मिळणाऱ्या उत्पन्नातून संसाराचा गाडा चालविणे अवघड झाले होते. आई व वडील आठवडे बाजारात भाजीपाला विक्री करतात. प्रियाच्या उच्च शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत पिंगळे कुटुंब होते. दहावीच्या निकालात प्रियाला चांगले गुण मिळाले. अवसरी खुर्द येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात गुणवत्तेच्या आधारे ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग पदवीसाठी प्रवेश मिळाला. येथील निकालातही तिला चांगले गुण मिळाले. पहिल्याच प्रयत्नात प्रियाची नुकतीच सहाय्यक आरेखकपदी निवड झाली आहे.

पेठ ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सरपंच राम तोडकर, शरद सहकारी बँकेचे संचालक संतोष धुमाळ, वाकेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मयूर काळे, युवा उद्योजक व ग्रामपंचायत सदस्य संजय पवळे, सोपान नवले, मनोहर भोजने ग्रामसेवक एस. एन. बनकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रियाचा सन्मान करण्यात आला.

माझी कौटुंबिक परिस्थिती बेताची आहे. अनेकदा पोटाला चिमटा घेऊन स्नेहल नीलेश टाके, दिव्या गणेश कर्डिले, प्रिया पिंगळे व मुलगा प्रणव पिंगळे यांच्या शिक्षणाची हेळसांड होऊ दिली नाही. आठवडे बाजार करून मिळणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा तर चालवलाच. पण, मुलांच्या शिक्षणाला सतत महत्त्व दिले. याकामी माझी पत्नी मनिषा पिंगळे यांची मिळालेली साथ अमूल्य आहे. मुलांनी माझ्या कष्टाचे चीज केले. याचा मनस्वी आनंद आहे.
- उदय पिंगळे, पेठ, (ता.आंबेगाव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com