महारक्तदान सप्ताहाचे
आजपासून आयोजन

महारक्तदान सप्ताहाचे आजपासून आयोजन

Published on

मंचर, ता. ९ : येथील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी व सर्व संलग्न संस्थांच्यावतीने पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या महारक्तदान सप्ताहाचे बुधवार (ता. १०) ते बुधवार (ता. १७) या कालावधीत आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्यातील २१ गावांत सकाळी सात ते संध्याकाळी सात या वेळेत आयोजन केले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास बजरंग दलाच्या वतीने भेटवस्तू, तसेच वर्षभरात गरज लागल्यास १ रक्ताची पिशवी मोफत देण्यात येणार आहे.
रक्तदानाचे ठिकाण व वेळ : बुधवारी (ता. १०) श्री वाकेश्वर मंदिर पेठ (ता. आंबेगाव) व महादेव मंदिर लोणी (ता. आंबेगाव), गुरुवारी (ता. ११) अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर (ता. आंबेगाव), ग्रामपंचायत हॉल नारोडी (ता. आंबेगाव), शुक्रवारी (ता. १२) श्री मारुती मंदिर घोडेगाव (ता. आंबेगाव), सटवाई देवी मंदिर लाखणगाव (ता. आंबेगाव), मारुती मंदिर पारगाव- शिंगवे (ता. आंबेगाव), शनिवारी (ता. १३) श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव), श्री मुक्तादेवी मंदिर पिंपळगाव घोडे (ता. आंबेगाव), रविवारी (ता. १४) श्री मारुती मंदिर पाबळ (ता. शिरूर), श्री काळभैरवनाथ मंदिर सभागृह अवसरी खुर्द (ता. आंबेगाव), श्री मारुती मंदिर कानसे, प्राथमिक आरोग्य केंद्र निमगाव सावा (ता. जुन्नर), श्री मारुती मंदिर उंब्रज न १ (ता. जुन्नर), एसकेएस मार्केट बनकर फाटा, श्री शंकर मंदिर चास, कृषी उत्पन्न बाजार समिती हॉल राजगुरुनगर (ता. खेड), सोमवार (ता. १५) हुतात्मा बाबू गेनू स्मारक महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव), कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर, मंगळवार (ता. १६), श्री मारुती मंदिर शिनोली, बुधवार (ता. १७) नगरपंचायत पटांगण मंचर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.