

मंचर, ता. १ : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारी (ता. १) फ्लॉवरला प्रतिकिलोला ३३ रुपये, गवार व घेवड्याला प्रतिकिलोला ९० रुपये उच्चांकी बाजार भाव मिळाला. शेतीमालाचे बाजार भाव वाढत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे, असे आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले.
मंचर बाजार समितीत रविवार ते शुक्रवार या कालावधीत दररोज शेतीमालाची आवक होते. गेल्या आठवड्यात फ्लॉवरचे प्रति दहा किलोचे बाजार भाव १२० रुपये ते २६० रुपये होते. रविवारी फ्लॉवरला दहा किलोला ३३० रुपये बाजारभाव मिळाला. एकूण सात हजार २७० शेतीमाल डागांची आवक झाली.
प्रतिदहा किलोचे बाजार भाव : कारले- १२० रुपये ते ४०० रुपये, गवार ५२५ ते ९०० रुपये, घेवडा ९०५ रुपये, ढोबळी मिरची ४०० रुपये ते ७०० रुपये, भेंडी ३२५ रुपये ते ६२१ रुपये, शेवगा ४०० रुपये ते ५८० रुपये, लिंबू ३०० ते ६०० रुपये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.