भीमाशंकरला दर्शनासाठी 
ऑनलाइनने नावनोंदणी

भीमाशंकरला दर्शनासाठी ऑनलाइनने नावनोंदणी

Published on

मंचर, ता. २९ : भीमाशंकर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र धार्मिक स्थळ असून, देशभरातून दररोज हजारो भाविक येथे येतात. मात्र, भाविकांना अनेक तास रांगेत उभं राहावं लागणं, पार्किंगसह अन्य सुविधांचा अभाव, अवैध धंदे आणि गुन्हेगारी या समस्यांनी त्यांची गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर श्रावण महिन्यापासून भीमाशंकर येथे ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्रीक्षेत्र शिर्डीप्रमाणे १५- २० मिनिटांत दर्शन मिळेल,’’ असे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी (ता. २८) कुंभमेळ्यानिमित्त भीमाशंकर परिसर विकासासाठी मंजूर २८८ कोटी रुपये निधी कामांच्या आढावा बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ. नागनाथ यमपल्ले, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे आदी उपस्थित होते.
भीमाशंकर परिसरात भाविकांसाठी उपाययोजनांचा अहवाल जिल्ह्याधिकाऱ्यांना सदर केला जाईल, असे प्रांत शिंदे यांनी सांगितले. सुभाषराव मोरमारे, प्रकाश घोलप, संजय गवारी, प्रवीण पारधी, अमोल अंकुश, अॅड. किरण गभाले, नीलेश साबळे यांनी चर्चेत भाग घेतला

प्रशासन व देवस्थान ट्रस्ट दर पंधरा दिवसांनी संयुक्त बैठक घेतील. भाविकांसाठी सेवा सुधारण्याचे काम गतीने पार पाडतील. यासाठी आरोग्य सुविधा, औषधांचा साठा, तसेच सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम केली जाणार आहे.
- जितेंद्र डूडी, जिल्हाधिकारी

श्री क्षेत्र भीमाशंकर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. गुन्हेगार खुलेआम देशी कट्ट्यांसह फिरत आहेत. त्यामुळे देवस्थानची बदनामी होत आहे. पोलिस यंत्रणेने तातडीने कठोर पावले उचलावीत, अन्यथा मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लक्ष वेधावे लागेल.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com