मंचरला बुद्धिवंतांचा स्नेहमेळावा

मंचरला बुद्धिवंतांचा स्नेहमेळावा

Published on

मंचर, ता. १ : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कणखर, गतिमान व कार्यक्षम नेतृत्व असून, त्यांच्या योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचतो.’’ असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी केले.
मंचर-एकलहरे (ता. आंबेगाव) येथे मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या वर्षपूर्तीनिमित्त विविध क्षेत्रातील व्यावसायिक व बुद्धिवंतांचा स्नेहमेळावा आयोजित केला होता. त्यावेळी बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे, मंडलप्रमुख किरण वाळूंज, अशोक गभाले, जयसिंग एरंडे, संजय थोरात, अरविंद वळसे पाटील, संदीप बाणखेले, अॅड. समीर निघोट, दत्तात्रय थोरात, अजय घुले व मिलिंद खुडे आदी उपस्थित होते.
प्रा. पंजाबराव कथे यांनी, कार्यकर्त्यांनी मोदींच्या योजनांची माहिती गावागावात पोहोचवावी, असे आवाहन केले. डॉ. कराळे यांनी मोदी सरकारने गोरगरिबांच्या हितासाठी राबवलेल्या अनेक योजनांची माहिती दिली. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. जयसिंग एरंडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com