मंचरला आजपासून लोकोपयोगी उपक्रमांची मालिका

मंचरला आजपासून लोकोपयोगी उपक्रमांची मालिका

Published on

मंचर, ता.२१ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघात ‘जन विश्वास-लोकोपयोगी उपक्रमांची मालिका’ राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक गावात वृक्ष लागवड, १५ ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व शासन आपल्यादारी आदी कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार (ता.२२) ते बुधवार (ता.३०) या कालावधीत केले आहे, अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
मंचर (ता.आंबेगाव) येथे शरद बँकेच्या सभागृहात सोमवारी (ता.२१) झालेल्या पत्रकार परिषदेत वळसे पाटील बोलत होते. यावेळी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सुभाष मोरमारे, नीलेश थोरात, वैभव उंडे, सुनील बाणखेले, रवींद्र करंजखेले व दत्ता थोरात उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, “मुंबईत झालेल्या पक्षाच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला की, वाढदिवस केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित न ठेवता, तो जनहितकारी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करावा.”

उपक्रमांचे वेळापत्रक : मंगळवार (ता.२२) : बब्रुवाहन मंदिर ते नालंदा स्कूल (शेवाळवाडी) - वृक्ष लागवड, पर्यावरण विषयक मनोगते, बुधवार (ता.२३) : लोणी - शासन आपल्या दारी, सर्व गावांमध्ये वृक्ष लागवड, गुरुवार (ता.२४) : लांडेवाडी - वृक्ष लागवड, शुक्रवार (ता.२५) : कळंब, पारगाव, टाकळी हाजी, रांजणगाव, मंचर - रक्तदान शिबिर, शनिवार (ता.२६) : भराडी, खडकी, चांडोली बुद्रुक, पाबळ - रक्तदान शिबिर, रविवार (ता.२७) : मंचर शहर - जनजागृती रॅली, शिवगिरी मंगल कार्यालयात युवा संकल्प शिबीरात गणेश शिंदे यांचे व्याख्यान, सोमवार (ता.२८) : पारगाव तर्फे खेड, डिंभे, काठापूर - रक्तदान शिबिर, मंगळवार (ता.२९) : वळती, थोरांदळे, पिंपळगाव तर्फे महाळुंगे - रक्तदान शिबिर, बुधवार (ता.३०) : उपजिल्हा रुग्णालय, मंचर - आरोग्य शिबिर व लांडेवाडी, शिवसंकुल सभागृह - महिला सक्षमीकरण मेळावा महिला व बालकल्याणमंत्री अदिती तटकरे यांचे मार्गदर्शन.

13695

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com