मंचर उपजिल्हा रुग्णालयात ४६ रुग्णांवर शस्त्रक्रिया
मंचर, ता.३० : येथील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी (ता.३०) झालेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरात एक हजार २९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मोतीबिंदू, हाड व स्त्रीरोग अशा एकूण ४६ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रजनी प्रकाश फाउंडेशन व आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विष्णू हिंगे यांच्या हस्ते झाले.
यावेळी सुभाषराव मोरमारे, जनाबाई उगले, वैभव उंडे, सुषमा शिंदे, सुनील बाणखेले, सोपानराव नवले, दत्ता थोरात, माणिक गावडे, सागर काजळे उपस्थित होते. डॉ. शिवाजी जाधव, डॉ. अर्जुन दिघे, डॉ. मिनल भालचिम, डॉ. वैदेही धायबर, डॉ. राहुल जोशी, डॉ. कुलदीप कठाळे, डॉ. मारुती दाडगे, डॉ. विवेकानंद फसाले, डॉ. साहिल टाके व डॉ. भाग्यश्री अग्रवाल यांनी रुग्ण तपासणी व शस्त्रक्रिया केल्या. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांचे सहकार्य लाभले. परिचारिका व कर्मचाऱ्यांनी व्यवस्था पाहिली.
अॅड. वळसे पाटील म्हणाले की, वाढदिवसासाठी अनावश्यक खर्च करण्याऐवजी आरोग्य शिबिरे व वृक्ष लागवड संवर्धन असे कार्यक्रम राबवावेत.
राज्यात एकूण ७४ उपजिल्हा रुग्णालय आहेत. त्यामध्ये सर्वाधिक दररोज ७०० हून अधिक रुग्ण दाखल होणारे व मोफत सिटीस्कॅन सुविधा देणारे मंचर उपजिल्हा रुग्णालय एकमेव आहे. अवसरी फाट्यावर २०० बेडचे शासकीय रुग्णालयाचे काम सुरू आहे. सदर रुग्णालय सुरू झाल्यानंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे रूपांतर महिला रुग्णालय म्हणून करण्याचा मानस माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा आहे.
-अॅड. प्रदीप वळसे पाटील, उपाध्यक्ष, भीमाशंकर कारखाना.
13759
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.