अवसरी- पेठ घाटात 
पिकअप उलटली

अवसरी- पेठ घाटात पिकअप उलटली

Published on

मंचर, ता. १० : पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचर जवळील अवसरी- पेठ घाटात (ता. आंबेगाव) बुधवारी (ता. १०) सकाळी पावणे नऊच्या सुमारास पिकअप गाडीचा एक्सेल तुटल्याने अपघात झाला. गाडी दुभाजकाला धडकून उलटली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
फुरसुंगी, पुणे येथून नाशिककडे निघालेली पिकअप (क्र. एमएच. १३ टी. व्ही. ८२३) मधुकर मगर हे चालवत होते. उतारावरील वळणावर एक्सेल तुटल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटले. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाला गाडी जोरदार धडकली व विरुद्ध दिशेला पलटी झाली. अपघाताच्या वेळी समोरून कोणतेही वाहन येत नसल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी चालकाला सुखरूप बाहेर काढून धीर दिला. त्यानंतर पिकअप रस्त्याच्या बाजूला करण्यात आली.

14088

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com