पुणे
मंचर येथे एक हजार ९२८ रुग्णांची तपासणी
मंचर, ता. ४ : येथील उपजिल्हा रुग्णालयात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार ’ अभियानांतर्गत शुक्रवार (ता. १९) ते मंगळवार (ता. ३०) या कालावधीत शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराचा एक हजार ९२८ रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिराचा सांगता समारंभ बुधवारी (ता. १) पराग मिल्क फूड्स उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष देवेंद्र शहा यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी सर्पदंश उपचार तज्ञ डॉ. सदानंद राऊत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवाजीराव जाधव, बांधकाम व्यावसायिक गणेश बोराडे, ऋषिकेश गावडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य जगदीश घिसे, निळकंठ काळे, डॉ. रामप्रसाद धायकर, डॉ. अलकनंदा रेड्डी, डॉ. प्रतिभा कहडणे, रवींद्र करंजखेले, नेत्ररोग तज्ञ डॉ. राहुल जोशी, दत्तात्रेय कर्डिले आदी उपस्थित होते.