पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी नागापुरात आज लेखी परीक्षा

पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी नागापुरात आज लेखी परीक्षा

Published on

मंचर, ता. ७ :सैन्य व पोलिस दल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा बुधवारी (ता.८) दुपारी १ वाजता नागापूर (ता. आंबेगाव) येथे होणार आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव यांच्या अधिपत्याखालील नागापूर येथील प्रशिक्षण केंद्रात अनुसूचित जमातीतील युवकांना चार महिन्यांचे पोलिस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले आहेत.
एकूण १०० विद्यार्थ्यांची निवड प्रशिक्षणासाठी करण्यात येणार असून, ही संधी फक्त मुलांसाठी आहे. लेखी परीक्षेनंतर प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सर्व अर्जदारांनी वेळेत नागापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी केले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com