मंचरमध्ये तरकारीच्या बाजारभावात तेजी

मंचरमध्ये तरकारीच्या बाजारभावात तेजी

Published on

मंचर, ता.१३ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत आंबेगाव, खेड, जुन्नर, पारनेर आणि शिरूर या पाच तालुक्यांतील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तरकारी शेतमाल येतो. मात्र, रविवारी (ता.१२) बाजारात आवकेत घट मोठी घट झाली. त्यामुळे तरकारीच्या बाजारभावास तेजी आली. विशेष म्हणजे, बीटच्या दहा किलोला १८० ते ३६० रुपये इतका बाजारभाव मिळाला आहे.

बाजार समितीमध्ये एकूण १० हजार ४१२ डागांची आवक झाली. बीटच्या भावात वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. बाजारभावात झालेल्या वाढीबाबत माहिती देताना बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून परिसरात बीट, वटाणा, कारले, चवळी आदी पिकांची आवक घटली आहे. त्यामुळे भावात सुधारणा झाली असून, शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळत आहे.

शेतमालाचे नाव, कंसात आवक डाग व बाजारभाव दहा किलोचा भाव रुपयांत : बीट (१७५९) : १८०-३६०, वटाणा (३) : १६००, कारले (१२७) : २२०-४२५, घेवडा (४३) : ४५१-६६१, चवळी (१७९) : ३२०-६१२, ढोबळी मिरची (८७) : १५०-६५०, भेंडी (२६४) : २७५-५००, फरशी (१८७) : १९०-६००, फ्लॉवर (२९३४) : १४०-२६०, दोडका (७८) :२२०-५००, मिरची (२०३) : १००-९०१, वांगी (१०५) : ३३५-६००, दुधी भोपळा (१७६) : ४०-३००, टोमॅटो (२३३) : १९० -४००, मका (७५६) :५०-१३०, पावटा (३३) : २५१ -६०१, वालवड (१०५) : ५५० -६७०, राजमा (८१) : १५०-६०१, शेवगा (१२१) : १५५ -६२५, पापडी (१६६) : ४५०-६७०, गाजर (१४६) : ३०-२८०, सीताफळ (१५) : ६०-२८०, बटाटा (१६५) : ५०-१७०, कोबी (१२७७) : ४०-१७०, गवार (१५८) : १५१-१५००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com