मंचरमध्ये शिलालेख झाकल्या

मंचरमध्ये शिलालेख झाकल्या

Published on

मंचर, ता.५ : आंबेगाव तालुक्यातील मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होताच बुधवारी (ता.५) सकाळी प्रशासनाकडून शहरातील फ्लेक्स, पोस्टर व बॅनर हटविण्याची व शिलालेख झाकून ठेवण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. याकामात नगरपंचायतीतील १५ कर्मचारी सहभागी झाले होते.
शहरातील विविध राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार तसेच दीपावलीच्या निमित्ताने लावण्यात आलेले जाहिरातीचे फलक काढण्याचे काम सुरु झाले. आतापर्यंत तब्बल सात ट्रॅक्टर फ्लेक्स, बॅनर व होर्डिंग्ज काढल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे शहरात निवडणुकीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारचा नियमभंग न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद जाधव म्हणाले, “निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. प्रशासनाला सहकार्य करणे ही सर्वांची जबाबदारी आहे.” या निवडणुकीत एकूण १७ प्रभागांसाठी मतदान होणार असून, उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातूनही आपले अर्ज दाखल करता येणार आहे.

वॉर्ड क्रमांक***मतदार
१*** एक हजार ७१
२*** एक हजार १०४
३ *** ७०१
४***६४६
५**९३८
६ ** ७२८
७ **७१५
८ **८३२
९ **एक हजार ३७३
१०*** एक हजार ३५
११**एक हजार ४३१
१२** ७०३
१३ ***९१९
१४***९७५
१५*** एक हजार ११५
१६***एक हजार ४१६
१७ ***एक हजार ४६२

14502

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com