मंचर बाजार समितीत वटाणा, गवार तेजीत

मंचर बाजार समितीत वटाणा, गवार तेजीत

Published on

मंचर, ता. ६ : ‘‘मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी (ता. ६) दहा हजार ४४२ शेतमाल तरकारी डागांची आवक झाली असून प्रति दहा किलो वाटाण्याला एक हजार ५६० रुपये व गवारीला एक हजार १०० असा उच्चांकी बाजारभाव मिळाला. दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे पुणे-मुंबई भागातून तरकारी मालाची मागणी वाढली. परंतु, आंबेगाव तालुक्यात अनेकदा अतिरिक्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे पिक वाया गेल्याने आवक घटली आहे,’’ अशी माहिती बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी दिली.

तरकारीचे प्रति दहा किलो बाजारभाव रुपयांत (कंसात आवक)
बीट (३३५३) – १५५ ते ३०१, वांगी (११७) – २४० ते ४५०, राजमा (३८) – २०० ते ७००, बटाटा (८५) – १४० ते २४०, कारले (१८२) – १३‍० ते २५०, मिरची (५०६) – २७० ते ५००, काकडी (५४९) – १३० ते २५०, घेवडा (९४) – ३०० ते ६५०, चवळी (१५७) – २०० ते ४८१, ढोबळी मिरची (१५९) – २७५ ते ५००, भेंडी (१४५) – २९० ते ५१०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com