मंचरकारांनी घडविले माणुसकीचे दर्शन

मंचरकारांनी घडविले माणुसकीचे दर्शन

Published on

मंचर, ता. १२ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरजवळ तांबडेमळा (ता.आंबेगाव) येथे मंगळवारी (ता.११) रात्री साडेआठच्या सुमारास नागपूर येथील भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. एकूण तीन बसेसमधून तब्बल १५० भाविक प्रवास करत होते. त्यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. अपघातानंतर त्यांच्यासमोर निवास व भोजनाची मोठी अडचण निर्माण झाली होती. या प्रसंगी अभियंता संघटनेच्या माध्यमातून मंचर परिसरातील काही मान्यवर नागरिक तत्काळ मदतीला धावून आले. त्यांनी सर्व भाविकांसाठी विनामूल्य भोजन व मुक्कामाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले.
नागपूर जिल्हा अभियंता संघटनेचे सचिव गणेश शहारे, राज्याध्यक्ष सुहास धारासूरकर यांनी राज्य उपाध्यक्ष व पुणे जिल्हा शाखाध्यक्ष ज्ञानेश्वर उभे (रा.लांडेवाडी, ता.आंबेगाव) यांच्याशी संपर्क करून भाविकांवर उद्‌भवलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यानुसार उभे यांनी शिवसम्राट युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विकास भोर यांच्याशी संपर्क केला. दीपक भोर, प्रवीण भोर, शुभम भोर, आदित्य भोर, अतुल चासकर, मयूर भोर, विघ्नहर मंगल कार्यालयाचे मालक राजू भोर व अभियंता अक्षय इंदोरे व तांबडेमळा ग्रामस्थांनी भाविकांची भेट घेऊन त्यांना मानसिक आधार दिला. “अवसरी फाटा येथील विघ्नहर मंगल कार्यालयात मुक्काम व जेवणाची व्यवस्था केली. बुधवारी (ता.१२) सकाळी चहा व नाष्टा केल्यानंतर नागपूरला परत जाण्यासाठी खासगी बसची व्यवस्था करून दिली.” असे विकास भोर यांनी सांगितले.

अनोळखी ठिकाणी, रात्रीच्या वेळेस आम्हाला मिळालेली मदत आम्ही कधीही विसरू शकणार नाही. कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली. माणुसकीचे दर्शन घडविण्याचे काम मंचर परिसरातील नागरिकांनी केले.
- वेदांती पिसे, भाविक, नागपूर


4549

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com