आंबेगावात अपुऱ्या मनुष्यबाळामुळे डॉक्टर, कर्मचाऱ्यांची कसरत
डी. के. वळसे पाटील : सकाळ वृत्तसेवा
मंचर, ता.१६ : आंबेगाव तालुक्यात १०३ गावे व मंचर नगरपंचायत आहे. कार्यक्षेत्रात ३० पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळात सेवा देताना डॉक्टर व कर्मचाऱ्यांना अक्षरश: कसरत करावी लागते.
पशुवैद्यकीय अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व ब्रणोपचारक अशा एकूण मंजूर जागा ८० आहेत. ४५ जागा भरलेल्या असून ३५ जागा रिक्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पशुवैद्यकीय सेवेवर परिणाम होत आहे.
आंबेगाव तालुक्यातील पशुधन
आंबेगाव तालुक्यात एक लाख १४ हजार ९९९ पशुधन असून त्यामध्ये
गाय व बैल........७१ हजार २८२
म्हैस........७ हजार ६२३,
शेळ्या........३३ हजार ६७५,
मेंढ्या........२ हजार २५४
घोडे........१६५
आंबेगाव तालुक्यात लंपीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. यावर्षी लंपी रोगाचे प्रमाण तुलनेने जास्त नोंदले गेले. रोग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण राबविण्यात आले. पशुपालकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रम शेवाळवाडी व घोडेगाव येथे घेण्यात आले. याकामी कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव(ता.जुन्नर) यांची मदत मिळाली, अशी माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत साळवे यांनी दिली.
दृष्टिक्षेपात दवाखाना
- गीर गाय, संकरित गाय व खिल्लार बैल या जातींचे सीमेन स्ट्रो उपलब्ध
- वैरण बियाण्यांचे वितरणाचा तीन हजार शेतकऱ्यांना लाभ
- २०० पशुपालकांना घोडेगावात तालुकास्तरीय प्रशिक्षण
- घोडेगाव व शेवाळवाडी शिबिरात ४२५ शेतकऱ्यांचा सहभाग
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त उपक्रम
- चारा टंचाई टाळण्यासाठी तीन हजार ५०१ शेतकऱ्यांना वैरण बियाणे वाटप.
- गोशाळा परिपोषण योजना – शेवाळवाडी गोशाळेला लाभ.- १० + १ शेळी/मेंढी गट पुरवठा योजना – २३ लाभार्थी (२०२५).
- राष्ट्रीय पशुधन मोहीम (NLM) – सर्व माहिती ऑनलाइन नोंद.
नवीन पदे भरण्याची मागणी
मनुष्यबळअभावामुळे उपचार, लसीकरण, तपासणी या सेवांमध्ये विलंब होत असल्याची पशुपालकांची तक्रार आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असून, नवीन पदे भरण्याची मागणी जोर धरत आहे.
ता. एक एप्रिल ते ३१ऑक्टोबर २०२५ पर्यंतची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या........... ४ हजार ६५८
दर महिना होणारे कृत्रिम रेतन...........८०० ते ९००
गर्भ तपासणी...........९२५
वासरांचा जन्म ...........२ हजार १००
वंध्यत्व तपासणी...........४ हजार ५०९
लसीकरण
लाल खुरकूत.............७२ हजार
बुळकांडी प्रतिबंधक .............३१ हजार
आंत्रविषार प्रतिबंधक.............२४ हजार ३००
लंपी.............७२ हजार
संसर्गजन्य गर्भपात.............१२ हजार
रेबीज.............१९ हजार ७००
पद.............मंजूर जागा.............भरलेल्या जागा.............रिक्त जागा
पशुवैद्यकीय अधिकारी .............३०.............१२.............१८
पशुधन पर्यवेक्षक.............१३.............९.............४
परिचर.............३०.............२०.............१०
सहाय्यक पशुधन विकास अधिकारी.............२.............१.............१
ब्रणोपचारक.............५.............३.............२
एकूण.............८०.............४५.............३५
आंबेगाव तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवेतील रिक्त जागा भरण्याविषयी पुणे जिल्हा परिषदेकडे पत्र व्यवहार केला आहे. ज्याठिकाणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. तेथे जवळच्या दवाखान्यातील डॉक्टरकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. कुठल्याही दवाखान्यात पशुपालकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाते. प्रतिबंधात्मक लस व औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात आहे.
- डॉ. प्रशांत साळवे, पशुवैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती आंबेगाव तालुका.
14584
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

