निघोटवाडीतील तलाव दुरुस्तीसाठी ६१ लाख रुपये मंजूर : वळसे पाटील
मंचर, ता. २४ : निघोटवाडी (ता. आंबेगाव) येथे पाझर तलाव दुरुस्तीसाठी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे पाझर तलावात पुरेश्याप्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होईल. आवळीवस्ती, घोलवस्ती, भेकेमळा व मोरडेवाडी येथील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन शेतीसाठी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, असे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.
निघोटवाडी ग्रामपंचायत इमारत, भेकेमळा रस्ता, तपनेश्वर रस्ता, थुगाव व दस्तूरवाडी रस्ता तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा प्रसंगी वळसेपाटील बोलत होते.
यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा दूध संघाचे संचालक विष्णू हिंगे, गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे, मंचर वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले, उद्योजक बाबाजी टेमगिरे, श्यामकांत निघोट ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच नवनाथ निघोट, उपसरपंच चेतन निघोट व शिवाजीराव निघोट यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. दयानंद एरंडे. सनद निघोट, किसन निघोट यांनी व्यवस्था पाहिली.
14860
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

