अपघातग्रस्त कुटुंबाला शरद बँकेकडून मदत
मंचर, ता. ३ : मंचर (ता. आंबेगाव) येथील शरद सहकारी बँकेने अपघातात मृत्यू झालेल्या कर्जदार खातेदाराच्या वारसाला सहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून सामाजिक बांधिलकी जपल्याचे उदाहरण घालून दिले आहे.
जवळे (ता. आंबेगाव) येथील रहिवासी दिलीप जयराम येलभोर यांचा २६ ऑक्टोबर २०२५ रोजी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांनी शरद बँकेतून तीन लाख रुपयांचे पगारतारण कर्ज घेतले होते. बँकेमार्फत कर्जदारांसाठी वैयक्तिक अपघात विमा संरक्षण योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत येलभोर यांच्या नावावर पाच लाख रुपयांचा वैयक्तिक अपघात विमा होता. तसेच, ते बँकेचे सभासद असल्याने त्यांना एक लाख रुपयांचे अतिरिक्त विमा संरक्षण लागू होते. या दोन्ही योजनांमधून एकूण सहा लाख रुपयांचा धनादेश त्यांचे वारस हरिदास यलभोर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी दिली.
धनादेश वितरण प्रसंगी माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, संचालक शिवाजीराव लोंढे, दत्ता थोरात, निवृत्ती अभंग, अजय घुले, के. के. सैद, दौलतभाई लोखंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब जाधव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शरद सहकारी बँकेच्या २७ शाखा कार्यरत असून, १८ हजार पाच कर्जदार सभासद आहेत. बँक केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून, सभासद व कर्जदारांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहते. विमा योजनांमुळे संबंधित कुटुंबांना आर्थिक आधार मिळतो आणि सहकार क्षेत्रावरील विश्वास अधिक दृढ होतो.
- देवेंद्र शहा, अध्यक्ष, शरद सहकारी बँक, मंचर
15335
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

