

मंचर, ता. ४ : मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती रविवारी (ता. ३) भाजीपाल्याची एकूण ८४४१ डाग इतकी आवक झाली. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर काही पिकांच्या दरात चांगली वाढ दिसून आली. विशेषतः फरशीला प्रतिदहा किलोस १२१५ रुपये, तर लिंबाला १६०० रुपये असा उच्चांकी बाजारभाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांनी दिली.
फरशी व लिंबू यांना मिळालेल्या उच्चांकी दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. असे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले
प्रतिदहा किलोचे बाजारभाव (रुपयांत) : गवार : ५० ते ६१०, घेवडा : १०० ते ६००, राजमा : ६०० ते ७००, मिरची : ५० ते ५७०, आले : १५० ते ४५०, काकडी : १५ ते ३००, कारले ५० ते ३५०, कैरी : २० ते ३०१, कोबी : ३० ते ८०, गाजर : २० ते १५०, घोसाळी : १२० ते १३०, चवळी : १०० ते ३००, टोमॅटो : १८० ते ५५०, ढोबळी मिरची : ५० ते ३५०, तोंडली : १०० ते ३५१, दुधी भोपळा : २० ते २००, दोडका : २० ते ४००, पापडी :२८०, फ्लॉवर : १० ते १०० रुपये, बटाटा : ५० ते ७०, बीट : ३० ते २६० रुपये, भेंडी : ४० ते ३५० रुपये, लसूण : ९००, वांगी : २० ते ३५०, शेवगा : २०० ते ४०० रुपये असेही दर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.