Thur, March 30, 2023

कांबळेश्वरच्या तरुणावर
बलात्कारप्रकरणी गुन्हा
कांबळेश्वरच्या तरुणावर बलात्कारप्रकरणी गुन्हा
Published on : 15 February 2023, 9:38 am
माळेगाव, ता. १४ : कांबळेश्वर (ता. बारामती) येथील एका युवकाने २५ वर्षीय मतीमंद युवतीवर अत्याचार केला. त्यातून संबंधित पीडित युवती गर्भवती आहे. याप्रकरणी पीडित युवतीच्या आईने माळेगाव पोलिस ठाण्यात शिवराज पोपट खरात (रा. कांबळेश्वर) याच्याविरुद्ध फिर्याद दिली. त्याने पीडित मुलीच्या असाह्यतेचा फायदा घेत बलात्कार केला. तसेच, तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक साळवे हे पुढील तपास करत आहेत.