माळेगावात साखरेचा ट्रक उलटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माळेगावात साखरेचा ट्रक उलटला
माळेगावात साखरेचा ट्रक उलटला

माळेगावात साखरेचा ट्रक उलटला

sakal_logo
By

माळेगाव, ता. २ : माळेगाव (ता. बारामती) कारखान्यातून साखर वाहतूक करणारा ट्रक येथील इंग्लिश मीडियम स्कूलसमोरील वळणावर उलटला. या दुर्घटनेत रस्त्याच्या बाजूला उभा असलेला शालेय विद्यार्थी नैतिक भोसले याच्यासह अपघातग्रस्त ट्रक चालक जखमी झाला.
हा अपघात बुधवारी (ता. १) रात्री ९ वाजता झाला. या अपघातातून बचावलेला ट्रकचालक अजय आबासाहेब साबळे (रा. संभाजीनगर, उरुळी देवाची ता. हवेली) हा मद्यधुंद अवस्थेत आढळून आला. त्यामुळे गावकऱ्यांनी संताप व्यक्त करीत ट्रक पेटवून देण्याचे टोकाची भाषा वापरली. परंतु, पोलिस निरीक्षक किरण अवचार, पोलिस उपनिरीक्षक देविदास साळवे, तुषार भोर व पोलिस कर्मचाऱ्यांनी जमाव शांत केला. तसेच, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमित तावरे, प्रणव तावरे, महेश होले, प्रमोद जाधव आदींनी जखमींना वैद्यकीय उपचारासाठी हलविण्याकामे सहकार्य केले. तसेच, माळेगाव कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
अपघातस्थळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, माळेगाव कारखान्याचे संचालक स्वप्नील जगताप, माजी सरपंच दीपक तावरे, पंचायत समितीचे माजी सभापती संजय भोसले, युवा नेते रणजित तावरे यांनी भेट दिली.
या अपघातप्रकरणी जखमी मुलाचे वडील वैभव पाटील भोसले (वय ४२, रा. माळेगाव) यांनी ट्रक चालकाविरुद्ध माळेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस हवालदार जगताप हे तपास करीत आहेत.