कांबळेश्वरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांबळेश्वरमध्ये दोन गटांत
तुंबळ हाणामारी
कांबळेश्वरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी

कांबळेश्वरमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी

sakal_logo
By

माळेगाव, ता. १९ ः बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचे प्रकरण पुढे आले आहे. या प्रकरणात दोन गटांत तुंबळ हाणामारी आणि दगडफेक झाली आहे. शनिवार (ता. १८) रोजी रात्रीच्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले.

गावातील एका युवकावरच याप्रकरणी संशय घेतल्याने संबंधित युवकाने मित्रांच्या मदतीने मुलीच्या वडिलांची चारचाकी गाडी फोडून एकाला दांडक्याने जबर मारहाण केली. या घटनेची माहिती मिळतात दुसऱ्या गटातील लोकांनी मारहाण करणाऱ्या युवकांना पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांची एक मोटारसायकल मात्र सोडल्याने तीही फोडून टाकण्यात आली आहे. या प्रकरणात शंकर जानबा मदने (वय ४७, रा. कांबळेश्वर) यांनी माळेगाव पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली. त्यानुसार अर्जुन बाळासाहेब आडके, अक्षय पिसाळ, रोहित वाघमारे, करण बापू जगताप (सर्व रा. कांबळेश्वर, ता.बारामती), आदित्य अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण, ता.बारामती) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा पोलिसांनी दाखल केला. पोलिस निरिक्षक किरण अवचर पुढील तपास करीत आहेत.