शारदानगर येथे आज मधुमक्षिकापालन परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शारदानगर येथे आज मधुमक्षिकापालन परिसंवाद
शारदानगर येथे आज मधुमक्षिकापालन परिसंवाद

शारदानगर येथे आज मधुमक्षिकापालन परिसंवाद

sakal_logo
By

माळेगाव, ता. २२ : शारदानगर (ता. बारामती) येथे राष्ट्रीय मधमाशी मंडळ-नवी दिल्ली, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ आनंद -गुजरात आणि बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्यावतीने दोन दिवसीय राज्यस्तरीय मधुमक्षिकापालन परिसंवादाचे आयोजन केले आहे.
गुरूवार (ता. २३) व शुक्रवार (ता.२४) रोजी शारदानगर- बारामती येथे वरील मधुमक्षिकापालन परिसंवाद होणार आहे. विशेषतः या परिसंवादात मधमाशीचे परागीभवनात महत्व, मधमाशीच्या विविध जाती, कृत्रिमरीत्या राणी माशीची पैदास, मधमाशी पासून मिळणाऱ्या विविध पदार्थाचे उत्पादन, मधमाशीची हाताळणी, नैसर्गिक पद्धतीने शुद्ध मधाची काढणी, मधमाशी पालनासाठी लागणारे विविध साहित्य, मधमाशी पासून जास्तीत जास्त मधाचे उत्पादन घेण्यासाठी फुलोऱ्याचे व्यवस्थापन, तसेच मधमाशांचे कीड रोग आणि शत्रू व त्यांचे व्यवस्थापन, स्थलांतर, व्यावसायिक दृष्ट्या विविध अनुदानित योजना या विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन होणार आहे.