धोकादायक ठिकाणी कालवा मजबूत करावा

धोकादायक ठिकाणी कालवा मजबूत करावा

माळेगाव, ता. १० : ''''नीरा डावा कालव्याच्या बांधकामांचे आयुष्यमान तांत्रिकदृष्ट्या संपलेले आहे. परिणामी इंदापूर तालुक्यात एका महिन्यात दोन वेळा हा कालवा फुटला. पाणी वाया गेल्याने उन्हाळी आवर्तन विस्कळित झाले. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. या प्रतिकूल स्थितीतून कायमचा मार्ग काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी कालवा मजबूत केल्याशिवाय पर्याय उरला नाही,'''' असे मत कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी व्यक्त केले.

नीरा डावा कालव्यावरील उन्हाळी आवर्तनात सध्या विस्कळितपणा आला आहे. त्या पार्श्वभूमिवर कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बारामती उपविभागीय अभियंता अश्विन पवार उपस्थित होते. यावेळी धोडपकर म्हणाले, ``नीरा डावा कालव्याची वैभवशाली परंपरा आहे. या कालव्यातून १५२ किलोमीटर ग्रॅविटीने येणारे पूर्ण क्षमतेने पाणी, भव्य पूल व दगडी मोऱ्या, मैलाचे दगड, मजबूत मातीचे भरावे, संभाव्य धोके विचारात घेऊन ठिकठिकाणी त्यावेळी ब्रिटिशांनी केलेले दगडी अस्तरीकरण आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मिळालेले शाश्वत पाणी हे गतकाळातील समृद्ध वारशाची साक्ष देत होती. परंतु याच वैभवशाली कालव्याची दुरवस्था पाहवत नाही. सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक या कालव्याचे आयुष्य झाल्याने अनेक ठिकाणचे हे वास्तूवैभव आजच्या काळाच्या ओघात नेस्तनाबूत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा खात्याने कालव्याचे `पॅचवर्क`पद्धतीने भराव्याचे मजबुतीकरण हाती घेतले आहे. परंतु बारामती, इंदापूर भागात काही ठिकाणी शेतकऱ्यांचा या कामाला विरोध आहे. परिणामी संबंधित ठिकाणी मंजूर कामे करणे अवघड झाले आहे. एकाबाजूला कालव्याचे आयुष्य पूर्णतः संपलेले आले तर दुसऱ्याबाजूला कालव्याचे मजबुतीकरण करू दिले जात नाही. ``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com