‘पवार कृषी’च्या विद्यार्थ्यांचे 
राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

‘पवार कृषी’च्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Published on

माळेगाव, ता. २ : भारतीय कृषी संशोधन परिषद दिल्लीमार्फत घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय प्रवेश (कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती) परीक्षेत डॉ. शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामती येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
संपूर्ण भारतातून विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळण्यासाठी या परीक्षेची तयारी करतात. परीक्षेतून यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरीटनुसार कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्तीसह (ज्युनिअर रिसर्च फेलोशिप) भारतातील नामांकित कृषी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो.
बारामती कृषी महाविद्यालयाच्या एकूण आठ विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवत संस्थेच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक प्राध्यापकांचे ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे आणि संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी अभिनंदन केले.

यशस्वी विद्यार्थ्याचे नाव व त्यांना प्रवेश मिळालेले व कृषी विद्यापीठाचे नाव पुढीलप्रमाणे- पृथ्वीराज कोठावळे- डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ पुसा (कृषी अर्थशास्त्र), वैष्णवी अभंग- डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ पुसा (कृषी अर्थशास्त्र), पंकज वाघ- राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ झाशी (वनस्पती विकृतीशास्त्र), अंजली दहातोंडे- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (कृषी विस्तार शिक्षण), सौरभ नरुटे- महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी (कृषी सूक्ष्म जीवशास्त्र), सौरभ मुदगलकर- लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (प्रवेश परीक्षा- अनुवंश व वनस्पती पैदास शास्त्र), राजलक्ष्मी राऊत- लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, फगवाडा (प्रवेश परीक्षा- अनुवंश व वनस्पती पैदास शास्त्र), कविता मोरे- चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर (वनस्पती विकृतीशास्त्र).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.