फोटो काढल्यावरून
कार्यकर्ते आक्रमक

फोटो काढल्यावरून कार्यकर्ते आक्रमक

माळेगाव, ता. ६ : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळातील एका कार्यालयातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटो काढल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, याबाबत प्रशासनाने खुलासा केल्यानंतर वादावर पडदा पडला.
या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत, परंतु या संस्थेमधील एका कार्यालयामध्ये असलेला त्यांचा फोटो काढून बाजूला ठेवल्याचे माहिती पुढे आली. त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते प्रशासकीय कार्यालयासमोर सायंकाळी एकवटले होते. त्यामध्ये अमित तावरे, नितीन तावरे, प्रताप सातपुते, अजिंक्य वाघमोडे, वर्षा शिंदे, अर्चना पोळ, सुशील जगताप, महेश जगताप, तेजस तावरे, सचिन गायकवाड, वैभव वाघमोडे, मयूर भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली.
याबाबत संस्था प्रशासनावतीने सचिव डॉ. धनंजय ठोंबरे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘पवारसाहेबांचा फोटो अनवधानाने काढला गेला होता आणि काही काळ सदरच्या जागेवर लावायचा राहून गेला. वास्तविक यातून भावना दुखविण्याचा आमचा उद्देश नव्हता. असे असले तरी या घटनेतून जर कोणाच्या भावना दुखविल्या असतील तर त्यासंबंधी संस्था प्रशासन दिलगिरी व्यक्त करीत आहे.’’ त्यानंतर वादावर पडदा पडला. यावेळी संस्थेचे विश्वस्त वसंतराव तावरे, गणपत देवकाते, महेश तावरे, पी. एस. जाधव आदी पदाधिकारी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com