बारामती राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा

बारामती राष्ट्रवादीचा 
वर्धापन दिन साजरा

माळेगाव, ता. १० : बारामती-कसबा येथील ‘राष्ट्रवादी भवन’मध्ये सोमवारी (ता. १०) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २५वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यासाठी कार्यकर्ते व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या वेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपस्थितांना पेढे भरून शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांनी बारामतीसह राज्याचा सर्वांगिण विकास साधण्यासाठी प्रचंड मेहनत केली आहे. त्यामुळे यापुढील काळात त्यांचे नेतृत्व आणि कर्तृत्व अधिक गतीने पुढे नेण्याची जबाबदारी सर्वाधिक बारामतीकरांवर आहे. आपल्यातील काहीसे असणारे मतभेद विसरून कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागणे गरजेचे आहे. आगामी काळात सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचणे खूप महत्त्वाचे आहे.’’
यावेळी ज्येष्ठ नेते बाळासाहेब तावरे, माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे, बारामती बाजार समितीचे सभापती सुनील पवार आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com