‘माळेगाव’ जिंकक्यासाठी मोर्चेबांधणी

‘माळेगाव’ जिंकक्यासाठी मोर्चेबांधणी
Published on

माळेगाव, ता.२४ः माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने विरोधकांच्या तुलनेत तुल्यबल आणि तरुण उमेदवार निवडण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंबर कसली आहे. तालुक्यात पवारांचे प्रतिस्पर्धी व ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे स्वतःच या निवडणुकीत पुन्हा उतल्याने दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार सोमवार (ता.२६) रोजी अजित पवार स्वतःच माळेगावसाठी तयार होणाऱ्या पॅनेलमधील संभाव्य उमेदवारांचा आढावा घेणार आहे, तर विरोधक दोन्ही तावरेंनीही सहा गटात अपेक्षित उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

माळेगाव कारखान्याची निवडणूक ही तरुणांना राजकीय धडे शिकविणारी निवडणूक मानली जाते. तसेच अजित पवार व त्यांचे प्रतिस्पर्धी चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचेही तालुक्यातील राजकीय अस्तित्व मजबूत करण्यासाठी माळेगावची निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे पवारांचे नेतृत्व या कारखान्यावर सन १९९७ व सन २०१४ वगळता अनेक वर्षे अबाधित राहिली. या दोन्ही तावरेंनीही माळेगाव कारखान्यावरील दोन वेळा पवारांची सत्ता खाली खेचल्याची नोंद आहे. त्यामुळे यंदाची माळेगावची निवडणूक या दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केली आहे. या राजकीय प्रक्रियेत आजी माजी पदाधिकाऱ्यांनीही आपली उमेदवारी जाहीर करून वरीष्ठांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये कारखान्याचे विद्यमान संचालक मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, सुरेश खलाटे, तानाजी पोंदकुले, संगीता कोकरे, पंकज भोसले, सागर जाधव यांचा समावेश आहे. माजी संचालकांमध्ये विलास देवकाते, रणजित खलाटे, रोहित जगताप, मनोजकुमार जगताप, ज्ञानदेव शिर्के, किरण आटोळे, किशोर पवार, माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे, अनिल वाघमोडे यांचा समावेश आहे.

राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर म्हणाले की, माळेगाव कारखान्यासह तालुक्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच माळेगाव कारखान्याच्या कार्य क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावगाड्याचा विकास अजित पवार यांनी केला आहे. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत निर्भीड आणि सडेतोड विकासाचे मुद्दे घेऊन राष्ट्रवादी पक्षाचा पॅनेल त्यांच्या नेतृत्वाखाली जिंकण्याचा मानस आम्ही बाळगाला आहे. त्यानुसार तुल्यबल आणि बहुतांशी तरुण उमेदवार निवडण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.

विरोधकांना एकाकी पाडण्याची मोहीम
माळेगावच्या निवडणुकीत विरोधक चंद्रराव तावरे यांनी सत्ताधाऱ्यांना चोख उत्तर देण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यानुसार खुद्द अजित पवार यांनीही विरोधकांना एकाकी पाडण्याची मोहीमच हाती घेतल्याचे दिसते. राष्ट्रवादीचा पॅनेल निवड करताना विरोधकांची राजकीय कोंडी होईल, असेच तुल्यबल उमेदवार निवडण्यासाठी तालुकास्तरीय पक्षश्रेष्टींची चर्चा सुरू केली आहे. त्यामध्ये अॅड.केशवराव जगताप, बाळासाहेब तावरे, राजवर्धन शिंदे, मदनराव देवकाते आदींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com