सोनकसवाडीतील हाणामारीप्रकरणी 
१७ जणांविरोधात गुन्हा दाखल

सोनकसवाडीतील हाणामारीप्रकरणी १७ जणांविरोधात गुन्हा दाखल

Published on

माळेगाव, ता. २२ ः सोनकसवाडी- शिवपुरी (ता. बारामती) येथील कोकरे व सुळ या दोन कुटुंबामध्ये मागील वादाच्या कारणावरून रविवार (ता. २१) तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही कुटुंबातील सातजण गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेमध्ये संबंधितांकडून जेसीबी, मोटार, दोन दुचाकींचीही मोठी तोडफोड झाली आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिस ठाण्यात कोकरे व सुळ या दोन्ही कुटुंबाकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी १७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी दिली.
दरम्यान, तुषार तात्यासाहेब कोकरे (वय २५, व्यवसाय मजुरी, रा. शिवपुरी सोनकसवाडी) यांच्या फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी सुळ कुटुंबातील नऊ लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यामध्ये अभिजित अनिल सुळ, यशराज ऊर्फ बबल्या सतीश सुळ, विश्वजीत अनिल सुळ, अनिल बाळासाहेब सुळ, विक्रांत जगन्नाथ सुळ, रमेश रघुनाथ सुळ, चित्रा जगन्नाथ सुळ, भाग्यश्री रमेश सुळ, सुरेखा सतीश सुळ (सर्व रा. शिवपुरी) यांचा समावेश आहे. तसेच, विक्रांत जगन्नाथ सुळ (वय २६, रा. शिवपुरी) यांच्या फिर्यादीवरून तुषार तात्यासाहेब कोकरे, मंगेश हनुमंत कोकरे, नवनाथ रमेश कोकरे, विलास जयसिंग कोकरे, रवींद्र राजेंद्र कोकरे, बापूराव राजेंद्र कोकरे, लंका हनुमंत कोकरे, राजाक्का कोकरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोखंडे करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com