
जमशेदजी टाटा यांना जयंतीनिमित्त अभिवादन
माले, ता. ३ : टाटा उद्योगसमूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची १८४ वी जयंती माले (ता. मुळशी) येथील मुळशी धरण विभाग शिक्षण मंडळाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत साजरी करण्यात आली. जमशेदजी टाटा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना जमशेदजी टाटा यांचे जीवन चरित्र, भारतीय उद्योगक्षेत्रात टाटा उद्योग समुहाचे योगदान याचा आढावा प्रशिक्षणार्थ्यांसमोर मांडण्यात आला. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योग सुरु करताना तोटा टाळण्यासाठी घ्यायची काळजी तसेच उद्योग वाढीसाठी करायचे प्रयत्न यांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी टाटा पॉवर कम्युनिटी ट्रस्टच्या कल्पना हबडे, टाटा स्ट्राईव्ह कंपनीचे समन्वयक अमोल जाधव, बीएससीक्स ऑटो इंडिया कंपनीचे संचालक प्रवीण पंडित, सखी महिला संघाच्या भारती पवार, संस्थेचे प्राचार्य सुरेश बामणे, निदेशक जनेश घुडे, अतुल जाधव, वैभव मालुसरे, अभिषेक उनवणे उपस्थित होते.