सामाजिक उपक्रम जनतेशी जाळ जोडण्याचे प्रभावी माध्यम
माले, ता. ३० : ‘समाजाच्या सर्व क्षेत्रांत शिवसैनिकांनी दिलेले योगदान हे उल्लेखनीय असून अशा सामाजिक उपक्रमांमधून जनतेशी नाळ जोडली जाते’, असे प्रतिपादन शिवआरोग्य सेनेचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर यांनी केले.
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा शिवआरोग्य सेनेच्या वतीने माले (ता. मुळशी) येथील आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर झाले. या वेळी ते बोलत होते. शिबिरात १५०० नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख उद्योजक माधवराव ऊर्फ आबासाहेब शेळके यांच्या पुढाकारातून हे शिबिर झाले. यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण आरोग्य विभाग, माले आरोग्य उपकेंद्र, लोपमुद्रा रुग्णालय पिरंगुट, सिम्बॉयसिस रुग्णालय लवळे, श्री गणेश रुग्णालय पिरंगुट, ओकेएस रुग्णालय रावेत, देशपांडे डोळ्याचा दवाखाना, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र माले, अंबडवेट, शेरे येथील एकूण १८ डॉक्टर्स, आशा व परिचारिका यांनी योगदान दिले.
कार्यक्रमाला सरचिटणीस जितेंद्र सपकाळ, शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे, युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, महिला आघाडीच्या सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले, कैलास मारणे, ज्ञानेश्वर डफळ, सूर्यकांत साखरे, हनुमंत सुर्वे, अनिल आधवडे, नागेश साखरे, किशोर गायकवाड, यशवंत गायकवाड, दत्ता पंडित, नामदेव टेमघरे, डॉ. मल्हारी पिंगळे, रमेश शिरसागर, अनंता वाशिवले, मंजुश्री ढमाले, रंजना जाधव, सागर शिंदे, शकीर शेख, राम गायकवाड आदी उपस्थित होते. गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आरोग्य अधिकारी वामन गेंगजे, संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली. रुग्ण, ग्रामस्थांची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भोजन व्यवस्थाही होती. राजेंद्र नाईकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर शुभम शेळके यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.