माले येथे ५५० जातीच्या दाखल्यांचे वाटप
माले, ता. २८ : मुळशी तालुक्यातील आदिवासी व कातकरी समाजाला शासनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून माले (ता. मुळशी) येथे ५५० कातकरी बांधवांना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
महसूल प्रशासन सेवा पंधरवडा आणि रोहन फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील नाग्या कातकरी वसतिगृहात हा उपक्रम पार पडला. यावेळी आमदार शंकर मांडेकर, प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विजयकुमार चोबे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, रोहन बिल्डर्सचे प्रमुख सुहास लुंकड, सीएसआर विभाग प्रमुख अनुजा शम्स, वर्तिका भटेवरा, रा. स्व. संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण धबडगाव, जनजाती कल्याण आश्रमाचे अध्यक्ष प्रकाश धोका, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, माजी सभापती रवींद्र कंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, टाटा पॉवर कंपनीच्या सीएसआर विभागाच्या कल्पना हबडे, मंडळ अधिकारी प्रकाश वाघमारे, सरपंच सुहास शेंडे, उपसरपंच रंजना जाधव, माजी सरपंच अनिल आधवडे, वांद्रेचे सरपंच रमेश पडवळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रवींद्र चव्हाण, वंदना शेटे व कातकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदिवासी कातकरी समाजातील शेकडो बांधवांना त्यांच्या ओळखीचे दस्तऐवजीकरण म्हणजेच जातीचा दाखला मिळवून देण्यात आला. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी हा दाखला अत्यावश्यक आहे. शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती, घरकुल योजना आणि विविध सामाजिक सुरक्षा योजनांसाठी दाखला अत्यंत आवश्यक असतो.
दाखल्यांची प्रक्रिया राबवण्यासाठी त्रिमूर्तीचे संतोष सोळंके, प्रांत कार्यालयाचे योगेश भडाळे, पौड सेतू कार्यालयाचे राहुल रुकर, महा ई- सेवा केंद्र मालेचे तुषार थोरवे, पौडचे सुहास शेंडे, पिरंगुटचे समीर मोकाशी, उरवडेचे लहू बलकवडे, भुगावचे शिवदास मिटकरी, अजय सातपुते यांनी सक्रिय सहकार्य केले.
कार्यक्रमात स्थानिक कातकरी महिलांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक कापडी पिशव्या प्रमुख पाहुण्यांना भेट देण्यात आल्या.
सुवर्णा काळे यांनी आभार मानले.
01206
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.