खोलीकरणातील मातीस जळगावात शेतकऱ्यांची पसंती

खोलीकरणातील मातीस जळगावात शेतकऱ्यांची पसंती

मोरगाव, ता. १० : जळगाव क.प (ता. बारामती) येथे सकाळ रिलीफ फंड, शरयू फाउंडेशन, देसाई ब्रदर्स लिमिटेड पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बेंदीच्या ओढ्यावर खोलीकरण, रुंदीकरण आणि सरळीकरण असे काम सुरू आहे. ओढ्यातून निघालेली माती वाहून नेऊन शेतामध्ये टाकण्यासाठी शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे.

जळगाव येथील शेतकरी कायमस्वरूपी सिंचन योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र गेले अनेक वर्षांपासून नैसर्गिक जलस्रोतांवरच येथील शेती अवलंबून आहे. पावसाळ्यापूर्वी दरवर्षी येथील शेतकरी नैसर्गिक जलस्रोतांच्यामधील गाळ सामाजिक संस्था व लोकवर्गणी शेतकऱ्यांचा सहभाग यांच्या मदतीने काढण्यासाठी प्रयत्न करतात.
शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी येथील कामासाठी मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वी ओढ्यातील माती व मुरूम भराव्याला टाकून भरावा बळकटीकरण करण्यात आला मात्र येथील शेतकऱ्यांना या गाळरूपी काळी मातीची बांधबंधिस्ती, भरावा बळकटीकरण, पडीक जमीन लागवडीखाली आणणे यासाठी गरज असून स्वखर्चाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाळ वाहतूक करण्यासाठी येथील शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती येथील शेतकरी दिगंबर सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान,जास्तीत जास्त गाळ काढून नैसर्गिक स्रोत यांची पाणी साठवणूक क्षमता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती सरपंच रामदास जगताप यांनी दिली.


02151

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com