सायंबाचीवाडी येथे शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी प्रशिक्षण

सायंबाचीवाडी येथे शेतकऱ्यांना खरिपाच्या तयारीसाठी प्रशिक्षण

मोरगाव, ता.८ : सायंबाचीवाडी (ता. बारामती) येथे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांसाठी नुकतेच प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. बारामती कृषी विभागातर्फे त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बारामतीच्या तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली. बारामती तालुक्यातील सुपा, बारामती, वडगाव निंबाळकर, उंडवडी अशा चार मंडलमध्ये निवडक गावांमध्ये हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी नियोजनबद्ध पद्धतीने करावी, असे आवाहन प्रशिक्षण कार्यक्रमातून कृषी विभागाकडून करण्यात आले. कार्यक्रमात शेतकऱ्यांना घरगुती बियाणे, उगवण क्षमता तपासणे, माती परीक्षण, बीबीएफ पेरणी, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक, हुमणी नियंत्रण प्रकाश सापळा प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच मनरेगा फळबाग लागवड, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, यांत्रिकीकरण, शेततळे, अस्तरीकरण, सर्व योजना बद्दल अर्ज करण्याविषयी कृषी सहाय्यक तृप्ती गुंड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गावचे सरपंच जालिंदर भापकर व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, १५ जून ते १५ जुलै हा खरीप हंगामामधील पिकांच्या पेरणीचा योग्य कालावधी असून, सध्या बारामतीच्या जिरायती भागातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांची पेरणीपूर्व मशागत करत आहेत.


02214

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com