तरडोली तलाव १०० टक्के भरा
मोरगाव, ता. ५ : नाझरे जलाशय शंभर टक्के भरले आहे. या जलाशयाच्या अतिरिक्त पाणी साठ्यातून तरडोली तलाव १०० टक्के भरावा, अशी मागणी तरडोलीसह या परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांमधून होत आहे.
तरडोली तलावावर तरडोली, लोणी माळवाडी, मासाळवाडी, बाबुर्डी यासह भोईटेवाडी या पाच गावांच्या पाणीपुरवठा विहिरी अवलंबून आहेत. तलाव शंभर टक्के भरल्यानंतर पुढील वर्षभरात येथे पाण्याची टंचाई जाणवत नसल्याचा ग्रामपंचायतींना अनुभव आहे.
नाझरे जलाशय १०० टक्के भरल्यामुळे अतिरिक्त पाणी कऱ्हा नदी व तलाव भरण्यासाठी चोरवाडी येथील कॅनॉलमधून सोडण्यात आले आहे. मात्र, नदीपात्रात सोडलेले पाणी ऑक्टोबरपर्यंत बंधारे अडवत नसल्यामुळे वाहून जाऊन वाया जाणार आहे. तलाव भरण्यासाठी केवळ २० क्यूसेकने पाणी सोडले असल्याची माहिती नाझरे पाटबंधारे विभागाचे कालवा निरीक्षक यांनी दिली.
मात्र नदीपात्रा ऐवजी केवळ तलाव भरण्यासाठी वेगाने पाणी सोडल्यास किमान तलाव भरून मोरगाव तरडोली भागातील शेतकऱ्यांना मोठा पाण्याचा शाश्वत आधार मिळणार आहे.
दरम्यान, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक शेटे यांच्याशी संपर्क साधत तरडोली तलाव शंभर टक्के भरण्यासाठी वेगाने पाणी सोडण्याची मागणी केली.
तरडोली तलाव शंभर टक्के भरण्याचे निश्चित केले असून नाझरे जलाशयातून तो भरण्यात येईल. मात्र, कालव्याची क्षमता कशी आहे त्याच प्रमाणात पाण्याचा वेग सध्या तरी ठेवावा लागत आहे असे कार्यकारी अभियंता अशोक शेटे यांनी सांगितले.
तलवात केवळ ४० टक्केच साठा
सध्या येथील तलाव मृत पाणी साठ्यासह ४० टक्केच भरला आहे. तलावाची पाणी साठवणूक क्षमता ६० दशलक्ष घनफूट आहे. तरडोली, मासाळवाडी, लोणी भापकर या परिसरातील हजारो हेक्टर क्षेत्र या तलावामुळे ओलिताखाली येते त्यामुळे हा तलाव गतवर्षी साठ टक्के भरला होता, अशी माहिती उप अभियंता दत्तात्रेय कसबे यांनी दिली.
02980
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.