तरडोली तलाव भरल्याने मिटली शेतीसिंचनाची समस्या
मोरगाव, ता. २४ : तरडोली पाझर तलाव नुकताच शंभर टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय समाधानाचे वातावरण आहे. सध्या सांडव्यावरून पाणी वाहत . आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसिंचनाची किमान पुढील वर्षभराची समस्या सुटली आहे. तलाव भरल्यानंतर या तलावाच्या पाण्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी जल्लोष करत आनंद उत्सव साजरा केला.
तलाव कोरडा पडल्यानंतर मात्र, शेती करणे तर अडचणीचे होते पण पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरच्या पाण्याची गरज पडते. त्यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय नाझरे व पुरंदर उपसा अशा दोन्ही योजनांमधून येथे पाणी तलावासाठी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.
नाझरे जलाशय भरल्यानंतर अतिरिक्त पाण्यातून तरडोली तलाव प्राधान्याने भरावा या शेतकऱ्यांच्या मागणीमुळे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तलाव भरण्याच्या सूचना पाटबंधारे विभागास दिल्या होत्या. या तलावाच्या उद्भवावर तरडोली, माळवाडी लोणी, बाबुर्डी, मासाळवाडी, भोईटेवाडी या पाच गावांच्या पाणीपुरवठा विहिरी अवलंबून आहेत. तलाव भरल्यानंतर गावच्या पाणीपुरवठा विहिरी व नळपाणीपुरवठा योजना दोन्हींना मुबलक पाणी असते. सध्या तलाव शंभर टक्के भरून पाणी सांडव्यावरून वहात असल्याची माहिती नाझरे पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता गणेश गायकवाड व कालवा निरिक्षक अमित पटाडे यांनी दिली.
दृष्टिक्षेपात तलाव
* तरडोली तलावाची पाणी साठवणूक क्षमता ६० दशलक्ष घनफूट
* उपयुक्त ३८ दशलक्ष तर मृतपाणीसाठी २२ दशलक्ष घनफूट
* १५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली
* ५ गावांच्या पिण्याच्या पाणीपुरवठा विहिरी
नाझरे जलाशय शंभर टक्के भरल्यानंतर अतिरिक्त पाणीसाठ्यातून तरडोली तलाव शंभर टक्के भरण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवले होते. कारण कऱ्हा नदीत पाणी सोडले तरी १५ ऑक्टोबरनंतरच बंधारे अडविले जात असल्याने नदीतील पाण्याचा प्रत्यक्षात साठवणुकीसाठी फायदा होत नाही. मात्र, तरडोली तलाव भरल्यानंतर पाच गावांचा पिण्याच्या पाण्याचा व १५० हेक्टर क्षेत्राचा शेतीसिंचनाचा प्रश्न सहजतेने सुटण्यास मदत झाली आहे. भविष्यकाळात या तलावावर आमचे विशेष नियोजन राहणार आहे.
- अशोक शेटे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग
03223
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.