पुणे
भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी धायगुडे
मोरगाव, ता. १० : तरडोली (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी किसन हरीबा धायगुडे, तर उपाध्यक्षपदी रमेश कांतिलाल गाडे यांची नुकताच बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बारामतीचे सहाय्यक निबंधक प्रमोद दुर्गुडे यांनी काम पाहिले. अंतर्गत कमिटीत ठरलेल्या कालावधीप्रमाणे येथील अध्यक्ष फुलचंद नानासाहेब पवार व उपाध्यक्ष प्रियांका सोमनाथ भापकर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त जागेसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. यावेळी रामचंद्र भोसले, संजय भापकर, भगवान धायगुडे, तानाजी धायगुडे, राजवर्धन भापकर, संस्थेचे सचिव मोहन पवार, नवनाथ ठोंबरे उपस्थित होते.
03271, 03272