स्वर्गीय मित्राच्या इच्छेसाठी ७५० किलोमीटरचा प्रवास

स्वर्गीय मित्राच्या इच्छेसाठी ७५० किलोमीटरचा प्रवास

Published on

मोरगाव, ता. २९ : मित्रत्व म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणी सोबत असणे नव्हे, तर त्याच्या शेवटच्या इच्छेलाही सन्मानाने पूर्ण करणे होय. अशाच एका भावनिक स्नेहबंधातून बारामतीतील मोरया सायकल क्लब आणि बारामती सायकल क्लबच्या तरुणांनी आपल्या स्वर्गीय मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी सायकलवरून अष्टविनायक यात्रा पूर्ण केली.
बारामतीतील स्वर्गीय नितीन तावरे यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या शेवटच्या इच्छेपैकी एक इच्छा म्हणजे अष्टविनायक सायकल यात्रा पूर्ण करणे अशी होती. शारीरिक आणि मानसिक सुदृढ आरोग्यासाठी युवकांनी सायकल क्लबच्या माध्यमातून मैत्रीचे बंध विणत एकमेकांच्या जोडीने सायकल स्वारी सुरू केली होती. मात्र, मैत्रीच्या निखळ नात्यातून दुर्दैवाने एक मोती निखळला व नितीन यांचा मृत्यू झाला. त्यांची शेवटची इच्छा त्यांच्या जिवलग मित्रांनी पूर्ण केली आहे.
या मित्रांनी बारामती- मोरगाव येथून सुरुवात करून चार दिवसांत सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास सायकलवर करत सर्व अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेतले. ही यात्रा केवळ श्रद्धेची नव्हे, तर मैत्रीच्या नात्याचीही पवित्र साक्ष होती.
‘‘नितीनचा उत्साह आणि भक्तिभाव आमच्यात कायम जिवंत आहे. त्याच्या आठवणीनेच आम्ही ही यात्रा पूर्ण केली,’’ असे या मित्रमंडळींनी सांगितले.

या यात्रेतून त्यांनी समाजाला मैत्रीच्या नात्याचा अतूट संदेश दिला. या सायकल वारीत नवनाथ भापकर, नीलेश उत्तमराव घोडके, अक्षय कुदळे, अतुल लोणकर, राजेंद्र माळवदकर, रमाकांत तावरे, गौरव सुतार, गणेश गुप्ता, भरत खैरे, मच्छिंद्र केदारी, कृष्णा कांबळे, अथर्व जगताप यांनी सहभाग घेतला होता.

03304

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com