पाटस रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटस रेल्वे स्थानकाजवळ 
उड्डाणपूल करण्याची मागणी
पाटस रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करण्याची मागणी

पाटस रेल्वे स्थानकाजवळ उड्डाणपूल करण्याची मागणी

sakal_logo
By

मांडवगण फराटा, ता. १६ : पाटस (ता. दौंड) रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील सरपंच समिक्षा फराटे पाटील व उपसरपंच अशोक जगताप यांनी केली. मांडवगण फराटा ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबतचे निवेदन दौंडचे आमदार राहुल कुल यांना देण्यात आले.
मांडवगण फराटा व परिसरातील बाभूळसर बुद्रुक, गणेगाव दुमाला, तांदळी, इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा; तसेच श्रीगोंदा, पारनेर तालुक्यातील ग्रामस्थांची शिरूर-बारामती-सातारा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दळणवळण असते. तसेच, साखर कारखाना व गुऱ्हाळे यांची ऊस वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते. पाटस रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या १५ नंबर गेटवरील जो भुयारी मार्ग होत आहे, तो वाहतुकीस अतिशय अयोग्य आहे. त्यामुळे कानगाव-पाटस रस्त्यावरील रेल्वे गेट नंबर १५वर भुयारी मार्गाऐवजी उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी केली आहे.