Fri, Feb 3, 2023

कळंब येथील
डोंगरावर वणवा
कळंब येथील डोंगरावर वणवा
Published on : 19 January 2023, 4:19 am
महाळुंगे पडवळ, ता. १९ : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत आंबेगाव व जुन्नर तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या कळंब डोंगराला गुरुवारी (ता. १९) सायंकाळी आग लागली. आगीचे कारण समजले नाही.
गेल्या दोन दिवसापासून येथे आग लागत आहे. डोंगरावर गवत वाळले होते. वाऱ्यामुळे आग भडकत होती. आग बघता बघता संपूर्ण डोंगरात पसरली. आगीमुळे वन हद्दीतील निसर्गाचे मोठे नुकसान झाले. जैवविविधता पशुपक्षी यासह वनस्पती व झाडे आगीत भस्म सात झाले आहेत. वन विभागाचे अधिकारी शशिकांत मडके यांच्यासह परिसरातील तरुणांनी आग आटोक्यात येण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रात्री साडेनऊ वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.